

Bhuvneshwar Kumar T20I Comeback | India T20I Squad Announced
Sakal
India T20I & India A Squads Named for New Zealand Tour: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मायेदेशात टी२० मालिका खेळत आहेत. ही मालिका संपल्यानंतर लगेचच भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्याला ५ सामन्यांच्या टी२० मालिकेने २२ ऑक्टोबर रोजी सुरुवात होईल. त्यानंतर वनडे आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
तसेच याचवेळी भारतीय अ संघ २४ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड अ संघाविरुद्ध बहुदिवसीय (कसोटी) तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे मंगळवारी बीसीसीआयने न्यूझीलंड दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. तसेच अ संघात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय अ संघाची निवड जाहीर केली आहे.