IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

West Indies set 172 runs Target for India in 1st T20I : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताचा पदार्पणवीर नमन धीर चमकला आहे. पण शे होप आणि शेरफेन रुदरफोर्डच्या अर्धशतकांमुळे वेस्ट इंडिजने १७० धावा पार केल्या आहेत.
India vs West Indies T20I

India vs West Indies T20I

Sakal

Updated on: 

India vs West Indies 1st T20I : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील टी२० मालिकेचा पहिला सामना लखनौला मंगळवारी (६ ऑक्टोबर) खेळला जात आहे.या सामन्यात भारतासाठी अष्टपैलू नमन धीरने (Naman Dhir) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने (Shai Hope) चांगली फलंदाजी केली. पण नमन धीरने त्याच्यासह वेस्ट इंडिजच्या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. पण अखेरीस अकिल हुसैन आणि शेरफेन रुदरफोर्डच्या (Sherfane Rutherford) आक्रमणामुळे वेस्ट इंडिजने भारतासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले.

India vs West Indies T20I
IND vs WI: ‘भारत सर्वात धोकादायक, पण आम्ही पाठ दाखवणार नाही!’ अकिल हुसैनचं टीम इंडियाला थेट आव्हान; १००व्या टी-२०आधी दिला इशारा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com