Will Vaibhav Sooryavanshi play first T20I against West Indies
esakal
India playing XI for first T20I against West Indies: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ विंडीजचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि काल लखनौच्या इकाना स्टेडियमवर कसून सराव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रयोग झालेला पाहायला मिळाला आणि वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन व अभिषेक शर्मा या तिन्ही सलामीवीरांना अंतिम ११ मध्ये एकत्र खेळवले गेले. त्यामुळेच विंडीजविरुद्धच्या मालिकेतही हेच कॉम्बिनेशन पाहायला मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, गोलंदाज प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल ( Morne Morkel ) याने महत्त्वाचे विधान केले. त्यामुळे वैभवला पुन्हा एकदा बाकावर बसवले जातेय की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.