IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

India vs West Indies Tests 2025: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ समोर आला आहे. या संघात सर्वात मोठी चर्चा म्हणजे कर्णधारपदाची.
KL Rahul set to lead Team India in West Indies Test series

KL Rahul set to lead Team India in West Indies Test series

esakal

Updated on
Summary
  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत लोकेश राहुलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

  • श्रेयस अय्यरचा संघात पुनरागमन निश्चित असून तो मधल्या फळीला बळकटी देईल.

  • यष्टिरक्षक म्हणून ध्रुव जुरेलला प्राधान्य दिले जाणार असून एन जगदीशन राखीव पर्याय आहे.

Team India’s Probable Test Squad vs West Indies: भारतीय संघ पुढील महिन्यात घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या पहिल्या सामन्यात लोकेश राहुलच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता बळावली आहे, तर श्रेयस अय्यरचे पुनरागमन होणार आहे. IND vs WI पहिली कसोटी २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आशिया चषक स्पर्धा २८ सप्टेंबरला संपतेय आणि चार दिवसांनी कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात नेतृत्व लोकेशकडे जाण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com