Jasprit Bumrah celebrates after bowling Justin Greaves with a perfect yorker
esakal
India vs West Indies 1st Test Marathi Update scorecard : भारतीय संघाने अहमदाबाद कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर गुंडाळला. मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेऊन वेस्ट इंडिजला पहिल्या सत्रातच बॅकफूटवर फेकले होते. त्याला जसप्रीत बुमरहाने ३, तर कुलदीप यादवने २ विकेट घेऊन चांगली साथ दिली. वॉशिंग्टन सुंदरनेही एक बळी टिपला आणि विंडीजचा डाव ४४.१ षटकांत गडगडला. जसप्रीतने अप्रतिम यॉर्कर टाकून जस्टीन ग्रेव्हिसचा त्रिफळा उडवला अन् मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.