Jasprit Bumrah and Mohammed Siraj removed West Indies’ openers early
esakal
India vs West Indies 1st Test Marathi Update scorecard : भारत-वेस्ट इंडिज पहिल्या कसोटीत पाहुण्या विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या स्टेडियमच्या खेळपट्टीवर गवत दिसत असल्याने पहिल्या सत्रात फलंदाजी करणे अवघड आहे. तरीही विंडीजने चौथ्या डावाचा विचार करून हे धाडस केले. ते तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील ही भारतातील पहिलीच कसोटी मालिका आहे. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांनी भारताला यश मिळवून देताना विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना मागे पाठवले.