Mohammed Siraj Dismantles West Indies Batting with Three Early Wickets
esakal
India vs West Indies 1st Test Marathi Update scorecard : भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला पहिल्या सत्रात बॅकफूटवर फेकले आहे. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) तीन विकेट्स घेताना विंडीजची अवस्था ४ बाद ४२ अशी केली आहे. सिराजने आधी सलामीवीरांना त्रास दिला आणि नंतर भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करणाऱ्या ब्रेंडन किंगला त्रिफळाचीत केले. त्याचा इन-स्विंगर किंगला पूर्णपणे चकवणारा ठरला.