KL Rahul century against West Indies in 1st Test
esakal
IND vs WI 1st Test Live Marathi Scoreboard News : भारतीय संघातील अनुभवी फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) याने कसोटीतील ११ वे शतक पूर्ण केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील १६२ घावांच्या प्रत्युत्तरात भारताने आघाडी घेतली आहे. लोकेशने भारताच्या डावाला सुरेख आकार दिला. काल पायाला क्रॅम्प आल्याने त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले होते, तरीही तो मैदानावर उभा राहिला. त्याने कर्णधार शुभमन गिलसह ९८ धावांची भागीदारी करून भारताला आघाडी मिळवून दिली.