IND vs WI 1st Test Live: नितीश कुमार रेड्डीचा 'उडता' कॅच! मोहम्मद सिराजने विंडीजला दिला पहिला धक्का... VIDEO

India vs West Indies 1st Test Marathi News : भारतानं दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजला पुन्हा लवकर धक्का देत सामन्यात पकड मजबूत ठेवली. मोहम्मद सिराजनं आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये तगड्या चंद्रपॉलला बाद करत शानदार सुरुवात करून दिली. या विकेटमागे नितीश कुमार रेड्डीच्या अफाट कॅचचा मोठा वाटा होता.
Nitish Reddy dives full-length to dismiss Chanderpaul off Siraj’s bowling in spectacular fashion.

Nitish Reddy dives full-length to dismiss Chanderpaul off Siraj’s bowling in spectacular fashion.

esakal

Updated on

IND vs WI 1st Test Live Marathi Scoreboard News : भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला डाव घोषित करून वेस्ट इंडिजला २८६ धावांच्या आघाडीचा पाठलाग करण्यास भाग पाडले आहे. पहिल्या डावात चार विकेट्स घेऊन विंडीजच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावातही विकेट घेतली. नितीश कुमार रेड्डीने स्क्वेअर लेगला हवेत झेपावत अविश्वसनीय झेल घेतला आणि विंडिजला ८व्या षटकात पहिला झटका दिला. सलामीवीर तेजनारायण चंद्रपॉल ( ८) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com