SHUBMAN GILL DISMISSED ON 50 AFTER SOFT SHOT IN IND VS WI TEST
esakal
IND vs WI 1st Test Live Marathi Scoreboard News : कर्णधार म्हणून भारतात पहिलीच कसोटी खेळणाऱ्या शुभमन गिलने ( Shubman Gill) अर्धशतक झळकावले. KL Rahul सह त्याने तिसऱ्या विकेटसाठी १९३ चेंडूंत ९८ धावांची भागीदारी करून भारताला आघाडीच्या दिशेने वाटचाल करून दिली होती. पण, अर्धशतकानंतर चुकीच्या फटक्याने त्याचा घात केला. वेस्ट इंडिजला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. गिल १०० चेंडूंत ५ चौकारांसह ५० धावांवर झेलबाद झाला. पण, त्याने अनेक विक्रम मोडले.