Shubman Gill addresses the media ahead of the first Test against West Indies, hinting at team combination changes.
esakal
Shubman Gill on India's playing XI for IND vs WI 1st Test : आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धा जिंकल्यानंतर आता भारतीय खेळाडू कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील बरेचसे खेळाडू विश्रांतीशिवाय कसोटीसाठी स्वतःला सज्ज करून अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत. भारताचे सराव सत्रही आज पार पडले आणि कर्णधार शुभमन गिलची पत्रकार परिषदही पार पडली. त्यात शुभमनने उद्याच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.