India secured their 921st international victory
esakal
IND vs WI 1st Test Live Marathi Scoreboard News : भारतीय संघाने अहमदाबाद कसोटीत एक डाव व १४० धावांनी विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारताचा हा मायदेशातील पहिलाच विजय ठरला. यापूर्वी मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाला ३-० असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. पण, शुभमनच्या संघाने वेस्ट इंडिजचा एकतर्फी निकाल लावला. मोहम्मद सिराजने दोन्ही डावांत मिळून ७ विकेट्स घेतल्या, तर रवींद्र जडेजाने शतकासह ४ विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी केली.