Rohit Sharma jogging celebration after century
esakal
ROHIT SHARMA’S UNIQUE CENTURY CELEBRATION GOES VIRAL: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावत पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली. मात्र, शतकापेक्षाही त्यानंतर केलेल्या खास सेलिब्रेशनची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. शतक पूर्ण केल्यानंतर रोहित शर्मा मैदानावर चक्क जॉगिंग करताना दिसला. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.