Sanju Samson scores 82 off 41 balls against West Indies
esakal
India vs West Indies 2nd T20I Marathi Live Updates: संजू सॅमसनला ( Sanju Samson) टीकेच्या तोफेसमोर उभे करून पाहणाऱ्यांना आज चांगलीच चपकार बसली. वर्ल्ड कप विजेत्या नायकाने पुन्हा एकदा दडपणात आपण काय करू शकतो हे दाखवून दिले. त्याला बसवून १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi) संधी द्या अशी वकिली करणाऱ्यांना संजूने कामगिरीतून उत्तर दिले. संजूचे शतक झाले असते तर आणखी मजा आली असती, पंरतु त्याला थोडक्यात अपयश आले. मात्र, त्याच्या आक्रमक फटकेबाजीने संघाला वेस्ट इंडिजसमोर तडगे लक्ष्य उभे करता आले.