
India vs West Indies 2nd Test Marathi Cricket News : मुख्य प्रशिक्षकपदाची सुत्र गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) हाती घेतल्यानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. कसोटीपाठोपाठ आता वन डे संघाचे नेतृत्व शुभमन गिलच्या ( Captain Shubman Gill) खांद्यावर सोपवले गेले. गिलच्या नेतृत्वाखालील पहिलीच कसोटी मालिका भारतीय संघाने इंग्लंडमध्ये जाऊन गाजवली आणि आता घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही मालिका सुरू असताना गिलकडे वन डे संघाचे नेतृत्व सोपवले गेले आणि गिलच का? या प्रश्नावर गौतमने मनातल्या भावना व्यक्त केल्या.