Gautam Gambhir angry reaction on Harshit Rana trolling
esakal
GAUTAM GAMBHIR ABOUT TROLLING HARSHIT RANA: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-० अशी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही सुधारणा केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंच्या या संघाने इंग्लंड दौरा गाजवला होता आणि आता मायदेशातील मालिकेत यश मिळवले. गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर युवा खेळाडूंना सातत्याने संधी मिळताना दिसतेय. त्याचवेळी त्याला टीकेचा सामनाही करावा लागतोय. त्यात प्रामुख्याने हर्षित राणा याला गौतम खूपच पाठिशी घालत असल्याची टीका होत आहे. त्यावर आज मुख्य प्रशिक्षकाने अखेर मौन सोडले.