IND vs WI 2nd Test Live: शुभमन गिल १२९ धावांवर नाबाद, तरीही टीम इंडियाने डाव घोषित केला! यशस्वी जैस्वालचे द्विशतक हुकल्याची सल...

India vs West Indies 2nd Test Marathi News :दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या डावात जोरदार कामगिरी करत ५१८/५ धावांवर डाव घोषित केला. शुभमन गिलने १२९ धावांवर नाबाद राहून संघाला मोठा आधार दिला, तर यशस्वी जैस्वालने दमदार १७५ धावा करून भारताचा डाव अजून भक्कम केला.
India declared at 518/5 in the 2nd Test against West Indies

India declared at 518/5 in the 2nd Test against West Indies

esakal

Updated on

India vs West Indies 2nd Test Marathi Cricket News : यशस्वी जैस्वालच्या १७३ धावांच्या खेळीनंतर शुभमन गिलने दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले. भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात भारताला धक्का बसला. यशस्वी दुर्दैवीरित्या धावबाद झाला आणि गिलच्या चुकीमुळे हे घडले. पण, गिलने स्वतःचा आत्मविश्वास खचू न देता शतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. गिलने नंतर नितीश कुमार रेड्डी व ध्रुव जुरेल यांना सोबतीला घेऊन भारताला पाचशेपार पोहोचवले. ध्रुवची विकेट पडताच गिलने डाव घोषित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com