India unchanged XI for 2nd Test against West Indies
esakal
Jasprit Bumrah rest Delhi Test India vs West Indies? भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातली दुसरी कसोटी लढत उद्यापासून दिल्लीत खेळवली जाणार आहे. भारताने अहमदाबाद येथे खेळवलेली पहिली कसोटी तीन दिवसांच्या आत जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ च्या दृष्टीने भारतासाठी घरच्या मैदानावरील कसोटी विजय महत्त्वाचा आहे. अशात दुसरी कसोटी जिंकून WTC Standings मध्ये आगेकूच करण्याची संधी आहे. पण, या कसोटीत टीम इंडिया त्याच विजयी संघासोबत उतरते की काही बदल करते, याची उत्सुकता आहे.