John Campbell celebrates his maiden Test century against India
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Cricket Update : जॉन कॅम्बेलच्या शतकाने वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात चांगले पुनरागमन करून दिले आहे. भारताच्या ५ बाद ५१८ धावांच्या उत्तरात विंडीजचा पहिला डाव २४८ धावांवर गडगडला. त्यामुळे पाहुण्यांना फॉलोऑन दिला गेला आणि दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजांची दमछाक झाली. विंडीजने चौथ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ३ बाद २५२ धावा केल्या आणि ते १८ धावांनी अजूनही पिछाडीवर आहेत. कॅम्बेल व शे होप यांनी १७७ धावांची भागीदारी करून सामन्यात रंगत आणली.