IND vs WI 2nd Test Live : साई सुदर्शनचे शतक थोडक्यात हुकलं! पठ्ठ्याने यशस्वी जैस्वालसह नोंदवला भारी विक्रम, १९६१ नंतर घडला असा पराक्रम

India vs West Indies 2nd Test Marathi News: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत साई सुदर्शनचे शतक थोडक्यात हुकले. त्याने ८७ धावांची खेळी साकारली, पण या खेळीतून त्याने यशस्वी जैस्वालसोबत ऐतिहासिक विक्रम रचला.
Sai Sudharsan celebrates his 87-run knock

Sai Sudharsan celebrates his 87-run knock

esakal

Updated on

India vs West Indies 2nd Test Marathi Update Cricket News : यशस्वी जैस्वालच्या दृढ निश्चयासमोर वेस्ट इंडिज रडकुंडीला आला. २३ वर्षीय सलामीवीराने पुन्हा एकदा आपली गुणवत्तता सिद्ध करताना शतकी खेळी केली. त्याच्यासोबतीला साई सुदर्शन उभा राहिला आणि या दोघांनी भारताला मजबूत स्थितीत ठेवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १९३ धावांची भागीदारी करताना मोठा विक्रम नोंदवला. १९६१ नंतर भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम पहिल्यांदाच घडला. सुदर्शनचे शतक थोडक्यात हुकल्याने भारतीय मात्र निराश झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com