Shubman Gill wins his first toss as India’s Test captain; Gautam Gambhir’s proud smile and Team India’s celebrations win hearts
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Update Cricket News : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रात चांगला खेळ केला. लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल यांना मोठी भागीदारी करता आली नसली तरी टीम इंडियाची सकारात्मक सुरूवात झाली, असे म्हणायला हरकत नाही. केएल राहुल ५४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३८ धावांवर यष्टीचीत झाला. पण, या सामन्यात टॉसच्या वेळी मजेदार प्रसंग घडला. कर्णधार शुभमन गिलने ( Shubman Gill ) नाणेफेक जिंकताच दूर डग आऊटमध्ये उभ्या असलेल्या गौतम गंभीर व जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्यावर हसू फुलले.. त्यानंतर भारतीय संघाचे सर्व सहकारी गिलचे अभिनंदन करायला धावले.