Yashasvi Jaiswal celebrates his century in the 2nd Test against West Indies, equaling Sachin Tendulkar’s iconic record
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Update Cricket News : यशस्वी जैस्वाल व साई सुदर्शन या डावखुऱ्या फलंदाजांनी वेस्ट इंडिजची डोकेदुखी वाढवली. लोकेश राहुलला ( ३८) बाद केल्यानंतर विंडीजला सामन्यावर पकड घेता येईल, असे वाटू लागले होते. पण, यशस्वी व साई सुदर्शन ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि शतकी भागीदारी केली. यशस्वीने सातत्य राखताना शतक झळकावून महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेच फॉर्माशी झगडणाऱ्या साई सुदर्शननेही अर्धशतक झळकावले.