Shubman Gill created history by equaling Sunil Gavaskar’s 47-year-old record
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Cricket News : टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याने अर्धशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. यशस्वी जैस्वालचे ( Yashasvi Jaiswal) द्विशतक हुकल्यानंतर गिलने मोर्चा सांभाळला अन् शतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्याने अर्धशतकीय खेळीनंतर महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दुसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा भारताच्या ४ बाद ४२७ धावा झाल्या आहेत आणि गिल ७५ धावांवर नाबाद आहे.