Shubman Gill reacts after India’s Test series win over West Indies, eyeing Mission Australia next.
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Updates : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिली कसोटी मालिका जिंकली. इंग्लंड दौऱ्यावर गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व आले होते आणि रोहित शर्मा, विराट कोहली व आर अश्विन या दिग्गजांशीवाय गिलने तो दौरा गाजवला. त्याने नेतृत्वाचे कौशल्य दाखवलेच, परंतु फलंदाजीतही विश्वविक्रमी कामगिरी केली. ती मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवून गिल ( Shubman Gill Captain) घरच्या मैदानावर प्रथमच कसोटीत नेतृत्व करायला उतरला. वेस्ट इंडिजविरुद्धची ही मालिका भारताने २-० अशी जिंकली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Point Table) गुणतालिकेत सुधारणा केली.