India vs West Indies 2nd Test live fans recall 1997 match loss
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Cricket Update : जस्टीन ग्रिव्ह्स व जेडन सिल्स या जोडीने १० व्या विकेटसाठी दमदार कामगिरी करताना भारतासमोर विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. फॉलो ऑन स्वीकारून दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने चांगली टक्कर दिली. कुलदीप यादव व जसप्रीत बुमराहने सेट फलंदाज बाद झाल्यानंतर पटापट विकेट्स घेतल्या, पण ९ बा ३११ धावांवरून विंडीजने ३८२ धावांपर्यंत मजल मारताना भारताची डोकेदुखी वाढवली. ग्रिव्ह्स व जेडन सिल्स या जोडीने ७९ धावांची भागीदारी केली आणि त्यांच्या भागीदारीने चाहत्यांना १९९७ चा सामना आठवू लागला आहे.