
India vs West Indies 2nd Test Marathi Cricket News : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही मजबूत पकड घेताना वेस्ट इंडिजच्या चार फलंदाजांना १४० धावांवर माघारी पाठवले आहे. भारताने पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला आणि विंडीजचा संघ अजूनही ३७८ धावांनी पिछाडीवर आहे. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालच्या ( Yashasvi Jaiswal ) हुकलेल्या द्विशतकाची चर्चा राहिली. कर्णधार शुभमन गिलच्या ( Shubman Gill wrong call) चुकीच्या कॉलने यशस्वी रन आऊट झाला. दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वीने त्यावर भाष्य केले.