Yashasvi Jaiswal turns doctor as he checks Shubman Gill after helmet blow in IND vs WI Test
esakal
Yashasvi Jaiswal turns into a doctor for skipper Shubman Gill : भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस यशस्वी जैस्वालच्या नावावर राहिला. वेस्ट इंडिज गोलंदाजांची चांगलीच धुलाई २३ वर्षीय यशस्वीने केली. त्याने दिवसअखेर नाबाद १७३ धावांची खेळी केली आणि आता दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या द्विशतकाची सर्वांना प्रतिक्षा आहे. त्याच्यासोबतीला साई सुदर्शननेही उल्लेखनीय खेळ केला आणि संघाला पहिल्या दिवशी २ बाद ३१८ धावांपर्यंत पोहोचवण्यात योगदान दिले. पण, या सामन्यात यशस्वीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यामध्ये तो कर्णधार शुभमन गिल याला “हे किती? हे किती... सांग!” असे विचारताना दिसतोय.