

IND VS WI 3RD ODI INDIA PLAYING XI CHANGES
esakal
IND VS WI 3RD ODI INDIA PLAYING XI CHANGES: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका आता शेवटच्या सामन्यावर आली आहे. भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
त्यामुळे आता भारताचा शेवटचा सामना जिंकून वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असेल. मात्र, या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ११मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बेंचवर असलेल्या काही खेळाडूंना तिसऱ्या वनडेत संधी मिळू शकते.