

SHREYAS IYER
esakal
SHREYAS IYER: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मायदेशात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाला २४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताकडे चौथा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी होती, मात्र ही संधी गमावल्याने आता मालिकेचा निकाल पाचव्या आणि अंतिम सामन्यानंतर ठरणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.
चौथ्या टी-२० सामन्यात नेमकी कुठे चूक झाली, याबाबत भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने सामना संपल्यानंतर भाष्य केलं. विशेषतः गोलंदाजी करताना केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करता आली नाही, असं त्याने सांगितलं.