RAVINDRA JADEJA NAMED VICE-CAPTAIN OF INDIA TEST TEAM, JASPRIT BUMRAH REPLACED
esakal
India Squad for West Indies Test Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघ जाहीर केला. आशिया चषक स्पर्धेत खेळत असलेला शुभमन गिल २८ सप्टेंबरला फायनल खेळून विंडीजविरुद्धच्या कसोटीसाठी अहमदाबाद येथे दाखल होणार आहे. घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून ही त्याची पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या या संघात आशिया चषक खेळणाऱ्या जसप्रीत बुमराह याचाही समावेश आहे. पण, असे असले तरी कसोटी संघाचा उपकर्णधार तो नाहीए... बीसीसीआयने उप कर्णधारपदाची जबाबदारी नव्याच खेळाडूला दिली आहे आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.