T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

India record chase in T20 World Cup history Marathi: करो वा मरो सामन्यात Sanju Samson याने जबरदस्त खेळी साकारत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजूने संयम आणि आक्रमकता यांचा सुंदर मेळ घालत सामन्यावर पकड मिळवली.
Sanju Samson powered India to a historic chase against West Indies

Sanju Samson powered India to a historic chase against West Indies

esakal

Updated on

India vs England semifinal Wankhede Stadium Marathi Cricket Updates : भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी संजू सॅमसनला ( Sanju Samson) राखून ठेवले होते आणि त्याने विश्वास सार्थ ठरवला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो वा मरो सामन्यात संजूच्या बॅटमधून निर्णायक धावा आल्या आणि भारताने विजयासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. संजूला आज कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांची चांगली साथ मिळाली आणि भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांचा सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून इतिहास रचला. उपांत्य फेरीत भारतासमोर आता इंग्लंडचे आव्हान असणार आहे. ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com