IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Shubman Gill injured by Mohammed Siraj delivery: वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलला नेट्समध्ये मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूचा फटका बसला.
Shubman Gill injured by Mohammed Siraj delivery

Shubman Gill injured by Mohammed Siraj delivery

Updated on: 

Shubman Gill injury ahead of West Indies series: भारत-वेस्ट इंडिज वन डे मालिका सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना कर्णधार शुभमन गिलला दुखापत झाली. नेटमध्ये सराव करताना मोहम्मद सिराजने टाकलेला वेगवान चेंडू त्याच्या उजव्या कोपरावर आदळला. त्यानंतर गिल वेदनेने विव्हळला आणि कोपरा पकडून बसला. त्याने सराव सत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो वन डे मालिकेतून बाहेर पडणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com