IND vs WI : संजू सॅमसनला लास्ट चान्स? विंडीज मालिका ठरू शकते शेवटची... दोन खेळाडूंनी त्याला दिलंय टेंशन

Sanju Samson last chance against West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील आगामी मालिकेपूर्वी संजू सॅमसनच्या फॉर्मची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. वर्ल्ड कपनंतर ११ डावांमध्ये त्याने केवळ दोन अर्धशतकं झळकावली आहेत, तर तब्बल सहा डावांमध्ये त्याला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
Sanju Samson - Vaibhav Sooryavanshi

Sanju Samson - Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on: 

India vs West Indies T20I Sanju Samson latest news: ५, ०, १, २७, १०, ५७, ५०, ९, ७, २, ११... ही संजू सॅमसनची मागील ११ ट्वेंटी-२० डावातील कामगिरी आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नायक ठरलेल्या संजूला सातत्य राखण्यात अपयश आले आहे. वर्ल्ड कपनंतर खेळलेल्या ११ डावात त्याने केवळ दोन अर्धशतकं झळकावली आणि सहा सामन्यांत त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्याचे दोन्ही अर्धशतकं ही अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत आली. या निराशाजनक कामगिरीमुळे संजूला टीकेचा सामना करावा लागतोय, त्यात दोन भारतीय खेळाडूंनी त्याचं टेंशन वाढवलं आहे. असाच फॉर्म राहिल्यास IND vs WI ही संजूची शेवटची ट्वेंटी-२० मालिका ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com