Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

Sanju Samson emotional post match interview T20 World Cup : संजू सॅमसनने सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त करताना डोळे पाणावले. ‘हा दिवस मी आयुष्यभर वाट पाहत होतो,’ असे सांगताना त्याने देवाचे आभार मानले. लहानपणापासून देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले आणि आज त्या स्वप्नाची मोठी पूर्तता झाल्याचे त्याने सांगितले.
Emotional Sanju Samson After Match-Winning Knock

Emotional Sanju Samson After Match-Winning Knock

ESAKAL

Updated on

PoTM Sanju Samson Calls It ‘One of the Greatest Days of My Life’ : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८च्या सामन्यात वेस्ट इंडिजवर रोमहर्षक विजय मिळवला. संजू सॅमसनने ५० चेंडूंत १२ चौकार व ४ षटकार लगावत ९७ धावांच्या नाबाद खेळीसह वेस्ट इंडिजने ठेवलेले १९६ धावांचे लक्ष्य ४ चेंडू व ५ विकेट्स राखून पार करून दिले. भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत केलेला हा सर्वाधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला आहे. यापूर्वी भारताने २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत लक्ष्याचा पाठलाग करताना संजूने सर्वोत्तम भारतीय खेळाडूच्या वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडला. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीयाची ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. या विक्रमात सुरेश रैना ( १०१ धावा वि. द. आप्रिका, २०१०) अव्वल आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com