

Ishan Kishan - Tilak Varma | India vs Zimbabwe 2nd T20I
Sakal
India vs Zimbabwe 2nd T20I: झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात हरारेमध्ये शनिवारी (२५ जुलै) दुसरा टी२० सामना होत आहे. या सामन्यात ईशान किशनने (Ishan Kishan) अफलातून फटकेबाजी केली. त्याला तिलक वर्माचीही (Tilak Varma) चांगली साथ मिळाली. त्यामुळे भारताने २०० धावांचा टप्पा पार करताना झिम्बाब्वेसमोर २२० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.