IND vs ZIM 2nd T20I : फक्त ४ धावा अन् तिलक वर्मा जाऊन बसला रोहित शर्मा, विराट कोहलीसह 'त्या' ८ जणांच्या स्पेशल लिस्टमध्ये

Tilak Varma joins Rohit Sharma Virat Kohli list: झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात तिलक वर्मा याने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत भारतीय क्रिकेटमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. सामन्यापूर्वी त्याला या विक्रमासाठी केवळ ४ धावांची गरज होती आणि ११व्या षटकात त्याने हा टप्पा सहज पार केला.
Tilak Varma reaches 1000 T20I runs away from home

Tilak Varma reaches 1000 T20I runs away from home

esakal

Updated on

IND vs ZIM 2nd T20I Tilak Varma milestone: भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ९० धावांनी विजय मिळवून झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून हा पहिलाच मालिका विजय आहे. काल हरारे येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन व तिलक वर्मा यांनी मैदान गाजवले. इशान प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला असला तरी, तिलकने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने चौथी धाव घेताच तो रोहित शर्मा, विराट कोहली या भारतीय दिग्गजांच्या एका विशेष विक्रमाच्या यादीत दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com