IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

India highest score in T20 World Cups history Marathi News: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेसमोर दमदार आणि आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.
Abhishek Sharma scored a crucial half-century

Abhishek Sharma scored a crucial half-century

esakal

Updated on

Abhishek Sharma half century vs Zimbabwe T20 World Cup : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठीच्या महत्त्वाच्या लढतीत झिम्बाब्वेसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. अभिषेक शर्माला ( Abhishek Sharma) गवसलेला सूर आजच्या सामन्यातील सर्वात दिलासादायक बाब ठरली. त्याने अर्धशतकी खेळी करताना भारताच्या धावसंख्येत मोठा वाटा उचलला. संजू सॅमसन, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी आक्रमक फटके खेचून अभिषेकचा आत्मविश्वास उंचावण्यात हातभार लावला. हार्दिक पांड्या व तिलक वर्मा यांची फटकेबाजी पाहण्यासारखी होती. भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या आज उभ्या केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com