IND W VS ZIM W: झिम्बाब्वेची फलंदाजी ढेपाळली, पण मेयर्सने हार मानली नाही! भारतासमोर ११५ धावांचं लक्ष्य, नंदनी शर्माची कमाल

IND W VS ZIM W 1ST T20: झिम्बाब्वे महिला संघाने पहिल्या टी-२० सामन्यात भारतासमोर ११५ धावांचे लक्ष्य ठेवले. शार्ने मेयर्सने नाबाद ४३ धावा केल्या, तर नंदनी शर्माने दोन विकेट घेतल्या.
IND W VS ZIM W

IND W VS ZIM W

esakal

Updated on: 

IND W VS ZIM W 1ST T20: भारत आणि झिम्बाब्वे महिला संघांमध्ये आजपासून ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. मालिकेतील पहिला सामना रायपूर येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे आधी फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वे महिला संघाने २० षटकांत ५ विकेट गमावून ११४ धावा केल्या. आता हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला ११५ धावा करायच्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com