IND W vs ZIM W: स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारताच्या नव्या पर्वाला सुरुवात! एकाच सामन्यात ६ खेळाडूंचं पदार्पण, टॉस जिंकून गोलंदाजी

IND W VS ZIM W 1ST T20: भारत आणि झिम्बाब्वे महिला संघांमधील टी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे. स्मृती मानधना कर्णधार असून पहिल्या सामन्यात सहा खेळाडूंनी पदार्पण केलं.
IND W vs ZIM W

IND W vs ZIM W

esakal

Updated on: 

IND W VS ZIM W 1ST T20: भारतीय महिला संघ आजपासून (१६ ऑक्टोबर) झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेला सुरुवात करत आहे. या मालिकेत तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

मालिकेतील पहिला टी-२० सामना आज रायपूरमध्ये होत आहे. या सामन्यातून भारतीय महिला संघाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडल्यानंतर स्मृती मानधना पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्यांदाच संघाची जबाबदारी सांभाळत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com