

IND W vs ZIM W
esakal
IND W vs ZIM W 2nd ODI: भारत आणि झिम्बाब्वे महिला संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना आज वडोदरा येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेसमोर तब्बल 329 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी शतकी खेळी केली.
भारताने या मालिकेतील पहिला वनडे सामना 9 विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला आहे.