IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

India Women Beat Zimbabwe Women by 4 Wickets in 1st T20I: झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाने ४ विकेट्स राखून विजय मिळवला. २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यामुळे भारत अडचणीत सापडला होता. मात्र, दीप्ती शर्माने नाबाद ४९ धावा, तर पदार्पण करणाऱ्या निक्की प्रसादने ३९ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.
IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय
Updated on: 

India Women Beat Zimbabwe Women by 4 Wickets in 1st T20I: भारताच्या महिला संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवला. बुधवारी झालेल्या या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या २७ धावांत भारताने ४ विकेट्स गमावल्या होत्या.

मात्र, दीप्ती शर्मा आणि पदार्पण करणाऱ्या निक्की प्रसादने डाव सावरला. दीप्तीच्या नाबाद ४९ धावांच्या जोरावर भारताने ११५ धावांचे लक्ष्य गाठले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com