

INDIA WOMEN BEAT ZIMBABWE BY 9 WICKETS
esakal
INDIA WOMEN BEAT ZIMBABWE BY 9 WICKETS: भारत आणि झिम्बाब्वे महिला संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला २३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेचा ९ विकेट्सने पराभव केला.
झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १९७ धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष्य २७.१ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.