IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

INDIA WOMEN VS ZIMBABWE WOMEN: भारत विरुद्ध झिम्बाब्वे पहिल्या वनडेत भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी. झिम्बाब्वेचा डाव १९७ धावांत आटोपला; श्री चरणीने ४, क्रांती गौडने ३ विकेट्स घेतल्या.
INDIA WOMEN VS ZIMBABWE WOMEN

INDIA WOMEN VS ZIMBABWE WOMEN

esakal

Updated on: 

INDIA WOMEN VS ZIMBABWE WOMEN: भारत आणि झिम्बाब्वेच्या महिला संघांमध्ये आजपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत झिम्बाब्वेचा डाव ४९.५ षटकांत १९७ धावांवर रोखला. त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यासाठी १९८ धावा कराव्या लागणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com