Dhruv Jurel smashed a blazing century against Australia A
esakal
IND A vs AUS A live score update today: भारताच्या कसोटी संघात स्थान मजबूत करण्यासाठी युवा खेळाडू जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ या सामन्यात त्यांना चांगलं व्यासपीठ दिलं आहे. या संधीचं सोनं करताना एन जगदीशन, अभिमन्यू इश्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल व ध्रुव जुरेल यांनी चांगली छाप पाडली आहे. इंग्लंड दौऱ्यावर रिषभ पंतच्या उपस्थितीमुळे फक्त एक कसोटी खेळण्याची संधी मिळालेल्या ध्रुवने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करून शतक झळकावले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघ निवडीपूर्वी हे शतक महत्त्वाचे ठरणार आहे.