Shreyas Iyer departs cheaply again as India A struggle against Australia A
esakal
ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ विरुद्ध पहिला डाव ६ बाद ५३२ धावांवर घोषित केला.
भारत अ ने ६७ षटकांत ४ बाद २३८ धावा केल्या असून अजून २९४ धावांची गरज आहे.
भारतासाठी अभिमन्यू इश्वरन (४४), एन जगदीशन (६४) व साई सुदर्शन (७३) यांनी चांगल्या खेळी केली.
India A vs Australia A unofficial Test live score update : भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात लखनौ येथे चार दिवसीय सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिला डाव ६ बाद ५३२ धावांवर घोषित केला अन् त्याच्या उत्तरामध्ये भारत अ संघाच्या ६७ षटकांत ४ बाद २३८ धावा झाल्या आहेत. त्यांना अजून २९४ धावा करायच्या आहेत. चार दिवसीय दोन सामन्यांतील हा पहिला सामना आहे आणि या मालिकेत चांगली कामगिरी करून आगामी वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात दावा सांगण्याचा खेळाडूंचा प्रयत्न आहे. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते, परंतु तो अवघ्या ८ धावा करून माघारी परतला.