IND vs ZIM: भारताच्या 113 पैकी तब्बल 20 खेळाडूंचं T20I पदार्पण झिम्बाब्वेविरुद्ध, विराट-सॅमसनचाही समावेश; पाहा लिस्ट

Team India T20 Players: झिम्बाब्वेविरुद्ध आत्तापर्यंत भारताकडून 20 खेळाडूंनी टी20 पदार्पण केले आहे. या 20 खेळाडूंमध्ये कोण-कोण आहेत, जाणून घ्या.
Dhruv Jurel, Abhishek Sharma
Dhruv Jurel, Abhishek SharmaSakal

Team India T20 Players Debut against Zimbabwe: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिकेचा पहिला सामना शनिवारी (6 जुलै) खेळला जात आहे. हरारेमध्ये होत असलेल्या या सामन्यातून भारताकडून तीन खेळाडूंचे पदार्पण झाले आहे.

खरंतर नुकताच टी20 वर्ल्ड कप संपला असल्याने या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश असलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Dhruv Jurel, Abhishek Sharma
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल; BCCI ने ज्याच्यावर बंदी घातलेली, त्यालाच दिली संधी

त्यामुळे या मालिकेसाठी युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच शुभमन गिलकडे नेतृत्वाची धूरा सोपवली आहे. दरम्यान, पहिल्याच सामन्यातून ध्रुव जुरेल, अभिषेक शर्मा आणि रियान पराग या खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण झाले आहे. भारताकडून टी20 पदार्पण करणारे अभिषेक शर्मा 111 वा, ध्रुव जुरेल 112 वा आणि रियान पराग 113 वा खेळाडू ठरला.

विशेष म्हणजे भारताकडून आत्तापर्यंत टी20 पदार्पण केलेल्या या 113 खेळाडूंपैकी तब्बल 20 खेळाडूंनी झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले आहे. यामध्ये विराट कोहली, केएल राहुल संजू सॅमसन अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. आता यात जुरेल, अभिषेक आणि रियानचाही समावेश झाला आहे.

Dhruv Jurel, Abhishek Sharma
IND vs ZIM: पहिल्याच T20I मधून रियान परागसह तीन खेळाडूंचे टीम इंडियाकडून पदार्पण; अशी आहे 'प्लेइंग-11'

झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण करणारे भारतीय खेळाडू

2010 - आर अश्विन, विराट कोहली, नमन ओझा, आर अश्विन, अमित मिश्रा

2015 - स्टूअर्ट बिन्नी, केदार जाधव, मनिष पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा, संजू सॅमसन,

2016 - युजवेंद्र चहल, ऋषी धवन, मनदीप सिंग, केएल राहुल, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी, बरिंदर स्त्रान.

2024 - ध्रुव जुरेल, अभिषेक शर्मा, रियान पराग

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com