

India A Beat Nepal by 306 Runs
esakal
India A Beat Nepal by 306 Runs: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत अ संघाने नेपाळविरुद्ध मोठा विजय मिळवला आहे. भारतीय संघाने तब्बल ३०६ धावांनी सामना जिंकत नेपाळला मोठा धक्का दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३३२ धावांचा डोंगर उभारला होता.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी नेपाळच्या फलंदाजांना मैदानावर टिकूच दिले नाही. नेपाळचा संपूर्ण संघ अवघ्या २६ धावांत बाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना एकतर्फी जिंकला. विशेष म्हणजे, नेपाळची अवस्था एका वेळी अवघ्या १ धावेवर ४ विकेट्स अशी झाली होती.