
भारत अ आणि इंग्लंड अ संघात कँटबरी येथे चार दिवसीय मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून (३० मे) खेळवला जात आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने जोरदार प्रत्युत्तर दिले असून दिवस अखेर भारताकडे नाममात्र ३० धावांची आघाडी आहे. त्यामुळे हा सामना आता अनिर्णित राहण्याकडे झुकताना दिसत आहे.
या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावातील ५३ षटकापासून आणि २ बाद २३७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी टॉम हेन्स १४७ चेंडूत १०३ धावांवर नाबाद होता, तर मॅक्स होल्डन ६१ चेंडूत ६४ धावांवर नाबाद होता.