
भारताचा अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून चार दिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना कँटबरीमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर भारतीय संघाकडे मोठी आघाडी आहे. भारताकडे ३२० धावांची आघाडी आहे.
शुक्रवारपासून सुरू झालेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ९१ षटकापासून ३ बाद ४०९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी करुण नायरने १८६ धावा आणि ध्रुव जुरेलने ८२ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली.