IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडचे शतक! भारताचा थरारक विजय, श्रीलंकेने हातचा सामना गमावला; आगरकरच्या उपस्थितीत पोरं चमकले

India A beat Sri Lanka A in tri-series opener: भारत अ संघाने डांबुला येथे झालेल्या तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान श्रीलंका अ संघावर रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला ऋतुराज गायकवाड. त्याने संयमी आणि दर्जेदार फलंदाजी करत शानदार शतक झळकावले आणि भारताला स्पर्धात्मक धावसंख्या उभारून दिली.
Ruturaj Gaikwad century against Sri Lanka A

Ruturaj Gaikwad century against Sri Lanka A

esakal

Updated on

India A vs Sri Lanka A thrilling match report : भारत अ संघाने तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंका अ संघावर रोमहर्षक विजय मिळवला. २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका विजयपथावर होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत सामन्याला कलाटणी दिली. त्यामुळे ऋतुराज गायकवाडचे ( Ruturaj Gaikwad Century) शतक व्यर्थ जातेय की काय, ही भीती नाहीशी झाली. भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) हा सामना पाहण्यासाठी डांबुला येथे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत भारताने उल्लेखनीय कामगिरी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com